उदयनराजेंना कास ई बस च्या उद्घाटनप्रसंगी डावलले?
सातारा:
कास पठारावर प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली याचं उद्घाटन मंगल प्रभात लोंढा पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून करण्यात आले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नारळ फोडून बस ने प्रवास करून बस केला.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल उपस्थित होते , मात्र उद्घाटनप्रसंगी लावण्यात आलेल्या बॅनर वरून खा. उदयनराजे भोसले यांचे नाव वगळल्याने परिसरात खंमग चर्चा रंगली होती. स्थानिक खासदारांना एवढ्या महत्वाच्या कार्यक्रमातून का डावलले असेल यावर उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे.