
सातारा
महाबळेश्वरात गो-कार्टिंग ट्रेकवर युवतीचा मृत्यू?
सातारा (महेश पवार) :
महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरातील एका गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागल्याने पर्यटक महिला ठार झाली. सना अमीर पेटीवाला वय वर्षे 24 राहणार मिरा रोड मुंबई असे या दुर्दैवी युवतीचे नाव आहे. मृत युवतीचा मृतदेह महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महाबळेश्वर पोलीस करत आहेत.
मात्र या घटनेनंतर गो-कार्टिंग करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर आले असून , यामुळे या अपघातास कारणीभूत असलेल्या संबंधितांवर आता कारवाई करण्याच्या मागणीला आता जोर धरू लागला आहे .


