पंतप्रधानांचा अमेरिकेमधल्या प्रमुख व्यावसायिकांशी संवाद…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉन एफ केनेडी सेंटर येथे अमेरिकेमधल्या व्यावसायिकांच्या मेळाव्याला संबोधित केले.
या कार्यक्रमाचे आयोजन USISPF अर्थात भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी संघाद्वारे करण्यात आले होते. अमेरिकेचे राज्य सचिव एच.ई. श्री. अँटनी ब्लिंकन हे देखील यावेळी उपस्थित होते.
भारतात सध्या होत असलेल्या सखोल परिवर्तनावर आणि विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. “हाच क्षण आहे” यावर भर देत पंतप्रधानांनी व्यावसायिकांना भारतासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील सुमारे आघाडीचे एक हजार व्यावसायिक उपस्थित होते.