google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

‘महाराज, तुम्ही छत्रपती आहात याचा विसर पडलाय का?’

सातारा (महेश पवार) :

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली हादरवून सोडली, छत्रपतींच्या मराठा सैन्याने अटकेपार झेंडा लावला, त्या छत्रपती घराण्याचे थेट वंशज आज उमेदवारीचे तिकीट मिळावे म्हणून दिल्लीत तळ ठोकून आहेत! कोण तर तेही छत्रपती उदयनराजे! ज्या उदयनराजेंचा दरारा अख्खा महाराष्ट्र जाणतो ते उदयनराजे एक तिकिटासाठी एवढा आटापिटा का करत आहेत? आम्हा जनतेला सर्वोच्च पद कोणते असेल ते म्हणजे छत्रपती! मग उदयनराजेंना आपल्या छत्रपती पदाचा विसर पडला आहे का? असा सवाल आता जनता विचारू लागली आहे.


आज छत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना तिकिटासाठी वणवण करावी लागत आहे त्याला अनेक कारणे आहेत. सलग दोन टर्म खासदार असलेले उदयनराजे मतदारसंघातील किती गावात दिसले? मतदारसंघात किती विकासकामे झाली? केवळ तोंडी सांगून आणि कागदाची जंत्री दाखवून विकास होत नसतो, हि वस्तुस्थिती तुम्ही विसरलाय. त्यामुळेच आज छत्रपतींवर हि वेळ आली, असे म्हणायचे का? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ तुमच्याच बगलबच्यांनी तुमच्यावर आणली असे म्हणायचे का? तर नाही! याला तुम्हीही जबाबदार आहात, असा सूर जनतेतून निघत आहे.


तुमच्याकडे असलेल्या ‘चंपा’ चे बालिश आणि अननुभवी सल्ल्ले सुद्धा याला कारणीभूत असतील. खरे तर तुम्ही जनतेने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा द्यायलाच नको होता पण, कोणत्या दीड शहाण्याने तुम्हाला सल्ला दिला आणि तुम्ही होत्याचे नव्हते करून बसला. तुम्ही छत्रपती आहेत, तुम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही हे तुम्ही सुद्धा अनेकदा सांगता. हो ते खरेच आहे पण, आता तुम्ही छत्रपती आहेत हे विसरलाय का? असा वास्तववादी प्रश्न सर्वांनाच पडायला लागला आहे.

छत्रपतींना तिकीट नाकारणाऱ्या भाजप आणि महायुतीकडे तुम्ही स्वतः दारोदार हिंडण्या पेक्षा तुमच्या ‘स्टाईल’ ने त्यांना दम भरायला पाहिजे होता. मला नको तिकीट, करा कोणालाही उभे, बघू कसा निवडून येतोय, बघतोच मी, असा दम भरला असता तर, आज ज्यांच्याकडे तुम्ही तिकीट मागत फिरताय ते सगळे तुमच्या ‘जलमंदिर’ मध्ये ठाण मांडून बसले असते, हे जनतेच्या मनातील उद्गार आहेत.

..


https://youtu.be/_gs-fK5WCqg

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!