google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कराड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार उघड…

स्टेडियमची नवी कमान पाडून परत करणार बांधकाम

कराड (अभयकुमार देशमुख) :
नगरपालिकेचा अजून एक गलथानपणा समोर आला आहे. कराडकरांकडे कर वसूल करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे अधिकारी शहरातील विविध काम करताना मात्र नियमांकडे डोळेझाक करताना दिसत आहेत.
साधारण दोन तीन वर्षापुर्वी शहारातील छ. शिवाजी महाराज स्टेडियमच्या मुख्य प्रवेश व्दारावर एक कमान उभारण्यात आली होती. अंदाजे त्या कमानीचा खर्च पाच ते सात लाखावर असण्याची शक्यता आहे. आता हीच कमान पाडण्याचे काम सुरु झाले आहे. कमान पाडण्यामागचे नेमके काय कारण आहे. हे मात्र गुलद्स्त्यात आहे. आणि याचीच विचारणा करण्यासाठी पत्रकारांनी नगरपालिकेत धाव घेतली. मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही.

अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांना समजल्यावर त्यांनी स्टेडियवर येत समंधित अधिका- यांना याबाबत फोनवर विचारणा केली. पाहुयात यावेळी ए आर पवार यांनी काय उत्तरे दिलेत.

 

दरम्यान या सर्व प्रकारानंतर काही प्रश्न उपस्थित राहतायत. ज्यावेळी कमान उभारयाचे काम सुरु होते. तेव्हा अधिका- यांचे त्याकडे लक्ष नव्हते का ? कमान पाडल्यानंतर आधी केलेल्या खर्चाची भरपाई कोण देणार ? आणि अशा भोंगळ कारभारावर वरिष्ट अधिकारी चाप लावणार का ?

जी कमान पुर्वी उभारलीय ती कमान चुकली असल्याचे या अधिका- यांनी सांगितले. म्हणजे कराडकरांच्या पैशाला कसलीच किमंत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का ? यासर्व प्रकाराबाबत प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगत अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही लागेबंध आहेत काय असा सवाल उपस्थित केलाय.
– प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!