Rajasthan CM : राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग…
Rajasthan CM : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावावरून अद्याप सस्पेंस आहे. राजस्थानमध्ये उद्या विधीमंडळ पक्षासोबत निरीक्षकांची बैठक होणार आहे. मात्र, यादरम्यान येणाऱ्या बातम्यांवरून येथील नेत्यांच्या बाजूने लॉबिंग सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत.
दुसरीकडे, राजस्थानचे (Rajasthan CM) विरोधी पक्षनेते राहिलेले राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा कोणताही गैरसमज नसावा, राजस्थानमधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने 199 पैकी 115 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरू आहे.
कोटा उत्तरमधून निवडणुकीत पराभूत झालेले प्रल्हाद गुंजाळ हे मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांचा प्रचार करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गुंजाळ जयपूरमध्ये पक्षाच्या बड्या नेत्यांची भेट घेत आहेत. तसेच, प्रल्हाद गुंजाळ हे सातत्याने वसुंधरा राजे यांच्या बाजूने नेत्यांचा पाठिंबा मागत आहेत. यापूर्वी एका आमदाराच्या वडिलांनीही वसुंधरा राजे यांच्या मुलावर आमदारांना रोखल्याचा आरोप केला होता.
One Comment