
पणजी :
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आज माहिती दिली की त्यांनी व विधानमंडळ काँग्रेस पक्षनेते युरी आलेमाव यांनी बेंगळुरूमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली,
या बैठकीदरम्यान, अमित पाटकर यांनी खरगेना ३० मे २०२५ रोजी होणाऱ्या गोवा राज्य स्थापना दिन समारंभासाठी अधिकृत आमंत्रण दिले. काँग्रेस अध्यक्षांनी हे आमंत्रण साभार स्वीकारले असून त्यांच्या उपस्थितीची खात्री दिली,
या बैठकीत गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली. भाजपप्रणीत सरकारचे अपयशी व जनविरोधी धोरण, तसेच राज्यभरातील वाढती जनतेची नाराजी यावरही चर्चा करण्यात आली.
पाटकर यांनी सांगितले की २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकांसाठीचा कार्ययोजना (रोडमॅप) विस्तृतपणे मांडण्यात आला. काँग्रेसचे संघटन स्थानिक स्तरावर बळकट करण्यावर भर देत, भाजपला पर्याय ठरेल असा विश्वासार्ह व जनतेकेंद्री पर्याय सादर करण्यावर भर देण्यात आला.
“खरगेना गोवा काँग्रेस नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे आमच्यासाठी एक मोठे बळ आहे. त्यांचा हा दौरा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम निर्माण करेल व संपूर्ण काँग्रेस संघटनात आत्मविश्वास वाढवेल,” असे पाटकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “गोव्याचे भविष्य पुन्हा मिळवण्याची चळवळ आता सुरू झाली आहे. आम्ही एकसंघ आहोत, ठाम आहोत आणि भाजपला थेट सामोरे जाण्यास पूर्णतः सज्ज आहोत, जेणेकरून गोव्यात चांगले शासन पुन्हा प्रस्थापित करता येईल.”