
Mahadayi Water Dispute:
म्हादईबद्दल भाष्य करण्यासाठी मी वैज्ञानिक तज्ञ नाही आणि म्हादईचे पाणी वळवण्याच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. या मुद्द्याचा तपशीलवार अभ्यास केल्यावर म्हादईबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
आज त्यांनी भाजप कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशावर दीर्घकालीन परिणाम करेल, असे सांगत विविध मुद्द्यांचा पुनरुच्चार केला. मात्र, म्हादईचा मुद्दा ज्या मंत्रालयावर बेतलेला आहे, त्याबाबत त्यांनी बोलणेच टाळले.
पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही ‘तथ्यांच्या आधारे अभ्यास करू’ इतकेच ते सांगत राहिले.
Union Minister of Labour & Employment Shri @byadavbjp along with State President Shri @ShetSadanand, Goa Minister Shri @nileshcabral MLA Shri @PremendraShet,
1/2 pic.twitter.com/RhjA1KHuar— BJP Goa (@BJP4Goa) February 4, 2023