google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

Redmi note: 200 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह येतोय ‘हा’ फोन

Redmi Note 13 Series :  पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच होईल. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये लाँच झालेली ही सीरिज आता जागतीक बाजारात दाखल होत आहे. रेडमीची ही आगामी सीरीज यावर्षी २०० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह आलेल्या Redmi Note 12 सीरीजची जागा घेईल. फोनच्या डिजाइन पासून फीचर्स पर्यंत मध्ये अनेक अपग्रेड पाहायला मिळू शकतात.

Redmi Note 13 Series चा भारतीय लाँच

Redmi India नं आपल्या ट्विटर हँडलवरून ह्या स्मार्टफोन सीरीजच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. रेडमी नोट १३ सीरीज ४ जानेवारी २०२४ लाँच केली जाईल. मागील सीरीज प्रमाणेच हे देखील Super Note टॅगलाइन सह प्रमोट केली जात आहे.

Redmi Note 13 Series चे फीचर्स पाहता ह्याच्या दोन्ही प्रो मॉडेलमध्ये १.५के फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. फोनचा डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ह्या सीरीजचा प्रो प्लस मॉडेल MediaTek Dimensity 7200 Ultra प्रोसेसरसह येतो. तसेच, प्रो मॉडेल Qualcomm Snapdragon 7s Gen 2 सह येतो. हे दोन्ही फोन २०० मेगापिक्सलच्या OIS कॅमेरा, ८ मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतील.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या दोन्ही मॉडेलमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. ह्यात ५०००एमएएचची बॅटरी मिळेल. ह्याच्या प्रो प्लस मॉडेलमध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग फीचर मिळेल. तसेच, ह्याच्या प्रो मॉडेलमध्ये ६७वॉट फास्ट चार्जिंग फीचर मिळेल. प्रो मॉडेलमध्ये ५,१००एमएएचची बॅटरी मिळू शकते.

Redmi Note 13 Series

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!