एस. शंकरसुब्रमण्यन यांची ‘कोरोमंडल’च्या एमडी आणि सीईओपदी पदोन्नती
कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या (CIL) संचालक मंडळाने आज पोषण व्यवसाय – कार्यकारी संचालक एस. शंकरसुब्रमण्यम यांची 7 ऑगस्ट 2024 पासून कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली.
शंकरसुब्रमण्यन यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे आणि मुख्य वित्तीय अधिकारी व व्यवसायप्रमुख म्हणून त्यांचे यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते मद्रास विद्यापीठातून मॅथेमॅटिक्सचे पदवीधर आहेत आणि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य आहेत व त्यांनी 2009 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम (AMP) पूर्ण केला आहे.
मुरुगप्पा ग्रुपशी त्यांचे नाते 1993 पासून सुरू झाले. त्यांनी कॉर्पोरेट फायनान्समधील ई.आय.डी. पॅरी (इंडिया) लिमिटेड येथे कारकिर्दीची सुरुवात केली. 2003 मध्ये कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये येण्यापूर्वी तेथे त्यांनी विविध भूमिकांमधून प्रगती केली.
न्यूट्रिएंट विभागाचे व्यवसायप्रमुख म्हणून त्यांच्या या कार्यकाळात कोरोमंडेलने उद्योगात आपले स्थान मजबूत केले आहे आणि नॅनो तंत्रज्ञान व ड्रोन फवारणी सेवांसह खाणकाम कार्यात प्रवेश करण्याबरोबरच नवीन उत्पादन पोर्टफोलिओमध्ये फायदेशीर, वैविध्यपूर्ण विकास केला आहे. ते कंपनीच्या काही उपकंपन्यांसह फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया, ट्युनिशियन इंडियन फर्टिलायझर एस.ए., ट्युनिशिया आणि फॉस्कोर (Pty) लिमिटेड, दक्षिण आफ्रिका या बोर्डांवरही काम करतात.