Chhattisgarh CM: साय यांच्या शपथविधीसाठी डॉ. प्रमोद सावंत रायपूरमध्ये दाखल
chhattisgarh cm :पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. आता या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची लगबग सुरू झाली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय हे आज, बुधवारी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत सहा मंत्रीही शपथ घेतील.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपचे नेतेही या सोहळ्यासाठी येऊ लागले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सिद्धार्थनाथ सिंह हे देखील छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचले आहेत.
दरम्यान, तत्पूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh CM) पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. मी छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.
राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांची संपूर्ण टीम मोदींची गॅरंटी नक्कीच पूर्ण करेल, हे मी खात्रीने सांगू शकतो.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सिद्धार्थनाथ म्हणाले की, आज छत्तीसगडसाठी मोठा दिवस आहे. लोकांनी छत्तीसगडमध्ये भाजपचे आगमन अशक्य मानले होते. पण भाजपचे लोक, इथले नेतृत्व आणि पीएम मोदींच्या गॅरंटीने ते दिसून आले.
आजचा दिवस आनंदाचा आहे, म्हणून आपण सर्वजण पंतप्रधान मोदी आणि छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे (Chhattisgarh CM) अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत.