google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन

Bangladesh Muhammad Yunus : बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र, आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून आज (८ ऑगस्ट) शपथ घेतली आहे. मोहम्मद युनूस यांच्यासह एकूण १५ सदस्यांनी शपथ घेतली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं असून या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस असणार आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर देशात शांतता प्रस्थापित करण्याचं मोठं आव्हान मोहम्मद युनूस यांच्यासमोर अर्थात या अंतरिम सरकार समोर असणार आहे.

दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलकांकडून करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानंतर मोहम्मद युनूस हे परदेशातून बांगलादेशमध्ये परतले होते. यानंतर आज त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे.

बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरीम सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्यांवरील आव्हानांचा सामना मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्यासाठी हे सरकार चालवणे आव्हानात्मक असणार आहे.

अंतरिम सरकारमधील सदस्य कोण आहेत?

सालेह उद्दीन अहमद (बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर)
डॉ.आसिफ नजरुल (ढाका विद्यापीठाचे शिक्षक)
आदिलुर रहमान खान (सचिव,अधिकार)
एएफ हसन आरिफ (माजी सल्लागार)
तौहीद हुसेन (माजी परराष्ट्र सचिव)
ब्रती शर्मीन मुर्शिद (ब्रातीचे मुख्य कार्यकारी अधिकारी)
नाहिद इस्लाम (भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीचे समन्वयक)
फरीदा अख्तर (कार्यकारी संचालक, विकास पर्याय संशोधन)
खालिद हसन (हेफाजते इस्लाम बांगलादेशचे माजी नायब अमीर)
सय्यदा रिजवाना हसन (मुख्य कार्यकारी, बांगलादेश पर्यावरण वकील संघ)
ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसेन (माजी निवडणूक आयुक्त)
नूरजहाँ बेगम (ग्रामीण बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक)
आसिफ महमूद

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!