google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

7 महिने, 6 जणांचा क्रू, 31 हजार किलोमीटर समुद्री प्रवासाचा थरार…

पणजी:

भारतीय नौदलाची सागरी नौका INSV तारिणी ची गोव्यात घरवापसी झाली आहे. गोव्यात बनलेल्या आणि सात महिन्यांपुर्वी सागर सफरीवर गेलेल्या या नौकेने या सात महिन्यांमध्ये तब्बल 17,000 नॉटिकल मैलांचा (सुमारे 31 हजार 484 किलोमीटर) खडतर प्रवास केला आहे. मंगळवारी INSV तारिणी गोव्यातील होम पोर्टवर परतली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत या नौकेचा फ्लॅग इन सोहळा पार पडला. या मान्यवरांच्या उपस्थितीत या नौकेचे स्वागत झाले.

या नौकेवरील कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा, ले. क. कमांडर निखिल हेगडे, लेफ्टनंट कमांडर दिलना के., लेफ्टनंट कमांडर रूपा ए. कमांडर दिव्या पुरोहित, कमांडर झुल्फिकार यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

गोव्यातील दिवार येथे नौदलाच्या अॅक्वारिस शिपयार्ड येथे या नौकेचे बांधणी झाली आहे. या बोटीवर सहा नौदल अधिकाऱ्यांचा ताफा होता. दरम्यान, नौदल आता या नौकेवरून एका महिला अधिकाऱ्याला जगभ्रमंती मोहिमेवर पाठवण्याची तयारी करत आहे.


त्या तयारीचा एक भाग म्हणून गतवर्षी 20 ऑगस्टपासून या नौकेतून दोन महिला अधिकाऱ्यांनी इतर चार अधिकाऱ्यांच्या फिरत्या क्रूसह अंतर-महासागर आंतरखंडीय प्रवास केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!