काँग्रेस उपाध्यक्ष सहपरिवार भाजपच्या वाटेवर…
महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, त्याच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसमध्ये एकाधिकारशाई दिसते आहे. याचमुळे काँग्रेस रसा तळाला जात आहे, कुठलीही चारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली नाराजी.
आज दुपारी दोन वाजताच निलंबित केल्याचे पत्र मिळाल मात्र कुठलिही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय ? असा सवाल सुद्धा डॉ. उल्हास पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कन्या डॉ. केतकी पाटील हीचा बुधवारी मुंबईत भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याची डॉ.उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भाजपमध्ये जाणार असल्याचा विचारला असता, कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. असे म्हणत डॉ. उल्हास पाटील यांनी पत्नी वर्षा पाटील यांना सोबत घेत कन्या केतकी पाटील सोबत बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत.