google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा

एअरबीएनबीने दिला २०२२ मध्ये गोव्याला ‘इतक्या’ कोटी डॉलर्सचा व्यवसाय…

पणजी:

एअरबीएनबी हा गोव्यातील पर्यटन उद्योगाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरला असल्याचे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गोव्याच्या एकूण उत्पन्नात एअरबीएनबीने १० कोटी ८० लाख डॉलर्सचे (८.५ अब्ज रुपये) योगदान दिले आहे, तर केवळ २०२२* ह्या वर्षांत ११,५०० स्थानिक रोजगार निर्माण करण्यात मदत केली आहे, असे ह्या अहवालात म्हटले आहे.

एअरबीएनबीचे ग्राहक करत असलेल्या खर्चाचा स्थानिक समुदायाला विविध प्रकारांनी लाभ कसा होतो हेही ह्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतामध्ये एअरबीएनबीच्या पाहुण्यांद्वारे (ग्राहकांद्वारे) केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये गोवा ह्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. गोव्याचे एकूण योगदान २०२२*मध्ये १८ कोटी ९० लाख डॉलर्स (१४.८ अब्ज रुपये) होते. वाहतुकीवर केलेला खर्च, रेस्टोरंट्समध्ये व रिटेल दुकानांमध्ये केलेला खर्च आदी खर्चांचा ह्यात समावेश होता.

एअरबीएनबीच्या भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग व तैवान विभागाचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले: “गोवा हे प्रचंड लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. गोव्यामध्ये केवळ दर्जेदारच नव्हे, तर शाश्वत व गोवन समुदायाला मदत करणाऱ्या पर्यटनाची जोपासना करणे किती मोलाचे आहे हे आम्हाला माहीत आहे. एअरबीएनबीचे पाहुणे स्थानिक कुटुंबे, व्यवसाय व समुदायांवर किती सकारात्मक परिणाम करतात हे ह्या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पर्यटन उद्योग केवळ सूक्ष्मउद्योजकतेच्या संधीच देत नाही, तर पर्यटनाशी निगडित अनेक उपक्रमांमध्ये स्थानिकांना रोजगारही मिळवून देतो.

भविष्यकाळात गोवा पर्यटन विभागाशी असलेला सहयोग अधिक दृढ करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सर्वोच्च दर्जाचे तसेच जबाबदार प्रवास पद्धतींना उत्तेजन देणाऱ्या पर्यटनाला एकत्रितफणे प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. त्यायोगे प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा होईल आणि त्याचवेळी राज्यातील स्थानिक समुदायांचीही जोपासना केली जाईल.

गोव्यातील एक सुपरहोस्ट शेरील गोन्साल्विस गेल्या २ वर्षांपासून एअरबीएनबीसाठी होस्टिंग करत आहेत. त्या त्यांच्या अनुभवाबद्दल म्हणाल्या, “हॉस्पिटॅलिटी व्यवसायातील खाचाखोचांबद्दल फारशी माहिती नसूनही मी गोव्यामध्ये होस्टिंगचे साहस केले. एअरबीएनबी हे पहिल्या पायऱ्या चढण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरले आणि तेव्हापासून मी आता शहरातील ८ लिस्टिंग्जपर्यंत मजल मारली आहे. ह्या काळात मला जगाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. माझ्या पाहुण्यांना अस्सल स्थानिक अनुभव मिळावा ह्याची खात्री करण्यासाठी मी अधिकाधिक स्थानिकांना कामे दिली. गेल्या काही वर्षांत एअरबीएनबीने केवळ मलाच नव्हे तर गोव्यातील अनेक होस्ट्सना आर्थिक स्वयंपूर्णता प्राप्त करण्यास सक्षम केले आहे आणि राज्यात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सूक्ष्म उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.”

एअरबीएनबीने २०२२मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्न्नात ९२ कोटी डॉलर्सचे (७२ अब्ज रुपये) योगदान दिल्याचे आणि ८५,००० रोजगारांच्या निर्मितीस मदत केल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले आहे. २०२२ मध्ये एअरबीएनबीच्या पाहुण्यांनी भारतात एकूण ८१ कोटी ५० लाख डॉलर्स (६४ अब्ज रुपये) खर्च केले. २०१९ मधील आकड्याच्या तुलनेत हा आकडा दुपटीहून अधिक आहे.

  • ह्या अहवालात मार्च २०२३ आणि त्यापूर्वीच्या बारा महिन्यांच्या काळातील निष्पत्ती प्रस्तुत करण्यात आली आहे आणि त्या वर्षभराला २०२२* असे संबोधण्यात आले आहे. ह्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा खुला झाल्यानंतरच्या संपूर्ण वर्षभराचा समावेश आहे. अभ्यासाच्या वेळी प्रचलित असलेले विनिमय दर लागू करून आकडेवारी देण्यात आली आहे. ह्यात ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सने स्वत: विकसित केलेला डेटा वापरण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!