google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले; तरूणाचा मृत्यू

कराड (महेश पवार) :

कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १०. ३० त ११ वाजण्याच्या हा अपघात झाला. सुजल उत्तम कांबळे (वय- १७ वर्ष, रा. कोळेवाडी, ता. कराड) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.


घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुसूर येथे रात्री उशिरा ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या गाडीने चौघांना उडवले. या गाडीवर शंकर खेतमर हा चालक होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या दिशेला जाताना अपघात झाला. अपघातात एका दुचाकीचे आणि पोलीस गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.


घटनास्थळी कराड तालुका पोलिसांनी धाव घेतली. तसेच जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
चालक शंकर खेतमर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. पहाटे पर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!