google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

भांडवलदारांच्या दावणीला गोवा बांधण्याची तयारी सुरू : काँग्रेस

मडगाव : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोहा  दौऱ्यानंतर कतार एअरवेजने दाबोळीवरुन मोपा येथे आपली विमानसेवा  हलविण्याची घोषणा केली. आता जामनगर विमानतळाला अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. अंबानींच्या कार्यक्रमात कतारचे पंतप्रधान उपस्थित होते. भाजपचे क्रोनी मित्रांवरील प्रेम पुन्हा एकदा उघड झाले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचे कॅबिनेट मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी जीएमआर दोबोळीतील विमानसेवा मोपा येथे हलवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत असल्याचे उघडपणे मान्य केल्यानंतरही मौन बाळगले आहे, असे अमित पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले.


केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकार आपला सुंदर गोवा क्रोनी भांडवलदारांच्या  स्वाधीन करण्यासाठी अत्यंत जलद गतीने योजना आखत आहे. भाजपच्या धोरणाने शेवटी गोव्यातील पर्यावरणाचा नाश होईल, असा दावा अमित पाटकर यांनी केला.


स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे नव्हे तर अंबानी, अदानी, वेदांता, जिंदाल सारख्या श्रीमंत आणि भांडवलदारांचे  ‘प्रधान सेवक’ आहेत, असा टोला अमित पाटकर यांनी हाणला आहे.मी उत्तर आणि दक्षिणेतील गोमंतकीयांना आवाहन करतो की, त्यांनी भाजपचा छुपा अजेंडा समजून घ्यावा आणि त्यांच्या कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज व्हावे. गोमंतकीय आताच जागे न झाल्यास थोड्याच दिवसांत, गोवा “क्रोनी हब” बनेल, असे अमित पाटकर म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोहा भेटीनंतर कतार एअरवेजने दाबोळीवरु  मोपा येथे स्थलांतरित होण्याची घोषणा केली हा निव्वळ योगायोग नाही. त्यानंतर लगेच कतारचे पंतप्रधान जामनगरमध्ये अंबानींच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. गोमंतकीयांनी हा घटनाक्रम लक्षात घ्यावा, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले आहे.


काँग्रेस पक्ष भाजप सरकारला दाबोळी येथील विमानसेवा बंद करु देणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मौन पाळल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!