google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘कार्यकर्त्यांना नाही तर, धनाढ्य व्यक्तींनाच भाजपमध्ये महत्व’


मडगाव : 

2021 मध्ये भाजपकडील माझ्या 20 दिवसांच्या अनुभवावरून मला खात्री पटली की भाजपात लॉयल्टीला किंमत नाही आणि त्यांचे लक्ष फक्त रॉयल्टीवर आहे. माझी भावनिक चूक माफ करून मला काँग्रेसमध्ये परत स्वीकारल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा ऋणी आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी म्हटले आहे.


कुडतरी भाजप मंडळाने भाजपात मोरेनो यांनी प्रवेश केला होता म्हणून केलेल्या टिकेला उत्तर  देताना, मोरेनो रिबेलो यांनी भाजप श्रीमंत आणि धनाड्यानांच महत्व देत असल्याचा आरोप केला.


कुडतरी जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी भाजपने उद्योगपती पल्लवी धेंपे यांना तिकीट दिल्याबद्दल त्यांचे मत मांडले होते. मला कळत नाही की भाजप मंडळाने मला अकारण त्यात का ओढले. यावरून भाजप हताश झाल्याचे दिसून येते, असे मोरेनो रिबेलो म्हणाले.


काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या विचारसरणीवर चालतो. आमचे नेते राहुल गांधी यांनीही गांधीवादी तत्त्वज्ञानाचे पालन केले आणि प्रेम आणि एकतेचा संदेश देण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली, असा दावा मोरेनो रिबेलो यांनी केला.


कुडतरी भाजपचे उमेदवार अँथनी बार्बोस यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत रॉयल्टीची झळ लागली होती हे त्यांनी लक्षात ठेवावे. मागच्या निवडणुकीत कुडतरी  भाजप मंडळाने पक्षाकडची निष्ठा सोडली आणि अपक्षांच्या रॉयल्टीला पाठिंबा दिला, असे मोरेनो रिबेलो म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!