google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडागोवा

‘सर्व मैदाने 20 सप्टेंबर पर्यंत फिफाच्या हवाली करणार’

सासष्टी:

गोव्यात 11 ऑक्टोबर पासुन सुरु होत असलेल्या 17 वर्षाखालील महिला वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची (Under 17 Women World Cup) तयारी युद्ध पातळीवर सुरु आहे. 20 सप्टेंबर पर्यंत फातोर्डा नेहरु स्टेडियम (Nehru Stadium, Fatorda) सह इतर पाच सराव मैदानांचे काम पुर्ण होईल. त्यानंतर सर्व मैदाने फिफाच्या स्थानिक आयोजन समितीकडे सुपुर्द केली जातील असे क्रिडामंत्री गोविंद गावडे (Govind Gaude) यांनी आज सांगितले.

आज सकाळी 10 वाजता क्रिडामंत्र्यांनी फातोर्डा स्टेडियमला भेट देऊन कामाची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी त्यांनी फ्लड लाईट, वातानुकुलीन व्यवस्था, मैदानावरील हायब्रिड टर्फ, पश्चिम स्टॅण्डवर आच्छादनासाठी पत्रे घालण्याचे काम, रंगरगोटी, खुर्च्या बदलण्याचे काम या सर्वांची माहिती घेतली. चषकाची तयारी विक्रमी वेळेत पुर्ण होत असल्याबद्दल क्रिडामंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

नेहरु स्टेडियमवर स्पर्धेतील सामने खेळले जातील तर टिळक मैदान, उतोर्डा, बाणावली येथील मैदाने सरावासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. शिवाय एक मैदान राखीव ठेवण्यात येणार असल्याचे क्रिडामंत्र्याने सांगितले. मैदानावर हायब्रीड टर्फे 100 x 64 चौरस मीटर जागेत घालण्यात येणार आहे. महिला फुटबॉल स्पर्धांसाठी फिफाची मार्गदर्शक नियम आहेत त्याप्रमाणे मैदानांची आखणी करण्यात आल्याची माहिती त्यानी दिली.

दहा ऑक्टोबर रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी (Shyama Prasad Mukharji) स्पर्धेचे उदघाटन होणार असुन या सोहळ्यास केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) उपस्थित राहणार आहेत. मुलींनी, महिलांनी व युवक वर्गाने हे सामने पहावेत त्यासाठी सरकारने त्यांच्यासाठी तिकीटी उपलब्ध करुन देण्याची तयारी ठेवल्याचेही क्रिडामंत्री म्हणाले.

या सर्वसाठी आत्तापर्यंत 12 कोटी रुपये खर्च आला असुन आणखी 2 ते 2.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. केंद्र सरकारकडुन या स्पर्धेसाठी खास निधी उपलब्ध झाला नसला तरी राज्यातील क्रिडा विकास कामासाठी केंद्र सरकारकडुन निधी उपलब्ध झाला आहे त्यातुन हा खर्च भागविण्यात आल्याची माहिती क्रिडामंत्र्याने दिली.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!