कंटाळा न करता बालदोस्तांसोबत सेल्फी काढणारी …
रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून उदयास आलेली आणि चिन्मय मांडलेकरांच्या चपखल दिग्दर्शनातून, उल्लेश खंदारे यांच्या रंगभूषेतून, महेश शेरला यांच्या वेषभूशेतून, अफलातून नेपथ्यातून , धम्माल संगीतातून , नेत्रदीपक प्रकाशयोजनेतून , उंदीर, मांजर, राजा, राजकन्या, सेनापती, ज्योतिषी अशा सर्व सह कलाकारांच्या साथीने आणि अद्वैत थिएटर व झी मराठीच्या निर्मितीतून साकार झालेली आबालवृद्धांची लाडकी चिंची चेटकिण…
कलाकार जरी असला नवीन तरी तीच धमाल, तीच जादू आणि दुप्पट एनर्जीने ही तुमचं मनोरंजन करेल… तुम्ही अनुभवाल आता ही जादुई दुनिया नव्याने, कारण नविन कलाकार लवकरच चेटकिणीच्या भूमिकेत येतोय त्याच ताकतीने….
गणेशोत्सवाच्या धुमधडाक्यानंतर तुमची आवडती चिंची चेटकिण पुनःश्च तुमच्या भेटीला येतेय.
मात्र आता नेमकी हि चेटकिण साकारणार कोण हे जाणून घेण्यासाठी लवकरच जवळच्या नाट्यगृहात आपली तिकिटे बुक करा आणि नक्की बघा अलबत्या गलबत्या…
शनिवारी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा येथील शाहुकला मंदिर येथे , तर रविवारी संध्याकाळी सात वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात.
अलबत्या गलबत्या पुन्हा करणार धमाल…. आणि “𝐒𝐡𝐨𝐰 𝐌𝐮𝐬𝐭 𝐆𝐨 𝐎𝐧” म्हणत नवी चिंचेची दाखवणार तुम्हाला तिच्या जादुई दुनियेची कमाल…