गोवा
‘वाईट अनुभवातून धडा घेत पुढे जाऊया’
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नववर्षानिमित्त गोव्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक कुटुंबात सगळ्यांना चांगले आरोग्य, आनंद लाभो व सर्वांना आगामी वर्ष हर्ष उल्हासाचे जावो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सावंत म्हणाले की, गेल्या वर्षभरात आपण काय केले, यावर मागे वळून विचार करण्याची ही वेळ आहे. ज्या वाईट गोष्टींचा आपल्याला अनुभव आला त्यातून धडा घेऊन, त्या सर्व कठोर भावना विसरून, पुढे पाऊल घालूया.