बंडखोर आमदार आज पोहचणार गोव्यात
पणजी:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याच पार्श्र्वभुमीवर महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या शिवसेनेच्या त्या 16 बंडखोर आमदार आज तीन वाजेपर्यंत गोव्यासाठी रवाना होणार आहेत
आज दुपारी 3.30 च्या सुमारास बंडखोर आमदार गोव्याला रवाना होणार असून तेथून ते उद्या मुंबईला रवाना होतील. म्हणजे बंडखोर आमदार आधी गोव्यात जाऊ शकतात, तिथून मग मुंबईत येतील.
16 बंडखोर आमदार गोव्यात हॉटेल ताजमध्ये उतरणार असून, बहुमत चाचणी साठी उद्या सकाळी ते गोव्यातून मुंबईला रवाना होतील. गोव्यातील ताज विवांता या हॉटेलमध्ये या आमदारांसाठी तब्बल 70 रूम बुक करण्यात आलेल्या आहेत. पहिल्यांदा गुजरात त्यानंतर आसाम आणि आता शेवटचा दौरा हा गोव्याचा असून, उद्या सकाळी ते मुंबईत दाखल होतील. आश्चर्याची बाब म्हणजे, तीनही भाजप शासित राज्यात या आमदारांना हालवण्यात आले आहे. उद्या सकाळी 11 च्या आधी ते मुंबईत दाखल होण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.