google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘का’ केली साताऱ्यातील ‘त्या’ मुलाने वडिलांची हत्या?

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीला कंटाळलेल्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. तर आईचीही हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
शहरातील सातारा परिसरातील डीलक्स पार्क येथील ही घटना असून श्रीकृष्ण पाटील वय ६२ वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबातील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते. यानंतर त्यांची मुलगी सकाळी आवाजाने जागी झाली तेव्हा पाटील यांचा मुलगा रोहित त्याच्या आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता. मुलीने आरडाओरड करताच तो पळून गेला. यानंतर ते हॉलमध्ये श्रीकृष्ण पाटील यांच्याकडे आले तेव्हा ते मृत अवस्थेत होते.

दरम्यान याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर उपायुक्त नवनीत कांवत, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तेव्हा कर्जाला कंटाळून आपणच हत्या केल्याची कबूली आरोपी रोहित याने दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपीविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!