google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘लक्ष्मण घोरपडे यांना झालेला कर्ज पुरवठा नियमानुसारच’

सातारा (प्रतिनिधी) :
सातारा जिल्हा बँक संलग्न निसराळे विकास सेवा सोसायटी लि., निसराळे संस्थेचे सभासद कै. लक्ष्मण पांडुरंग बाळकृष्ण घोरपडे यांचे नावे बँक अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने कर्जाची उचल करून फसवणूक केलेबाबत तसेच निसराळे विकास सेवा सोसायटी मध्ये गैरव्यवहार आणि चूकीचे कर्जवाटप करून अफरातफर केली असलेबाबत कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांचा मुलगा बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांनी इलेक्ट्रॉनिक मेडिया आणि वृत्तपत्र माध्यामाद्वारे बँकेवर आणि विकास सेवा सोसायटीवर आरोप केला असून निवेदन  बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांनी जिल्हाधिकारी, सातारा, मा. सहाय्यक महाप्रबंधक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, जिल्हा सैनिक कार्यालय, सातारा यांचेकडे याबाबत तक्रार केलेली आहे.
कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांना निसराळे ता.जि. सातारा या विकास सेवा सोसायटी मार्फत सन १९८९ पासून आज अखेर पिक कर्ज, सामान्य कर्ज, इलेक्ट्रिक मोटर पाईपलाईन कर्ज, शौचालय, कॅश क्रेडीट इ. करिता कर्ज अदा केलेले आहे. त्यांचे दिनांक ०३/०५/२०२१ रोजी निधन झाले असून सदर कर्जाची कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांनी त्यांचे हयातीत वेळेत परतफेड केली आहे. कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांना अदा केलेल्या अल्प मुदत व मध्यम मुदत कर्जाची वसुली रोखीने व लिंकींग पध्दतीने केलेली आहे. कै. घोरपडे यांना अदा केलेल्या कर्ज प्रकरणातील कर्ज मागणी अर्ज, कर्जरोखे, वचन चिठ्ठी, विड्रॉवल इ. वर कर्जदार कै. घोरपडे यांचे सही नमुने असून ते बँकेच्या खाते ओपनिंग फॉर्मवरील सही नमुन्याशी जुळत आहेत. तक्रार अनुषंगाने बँक व मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सातारा तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचे मार्फत कर्जदार कै. घोरपडे यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अतीत व संलग्न निसराळे वि .का .स .सेवा सोसा. चे सभासद कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांचे खात्याची छाननी व सखोल चौकशी केली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी तक्रारदार बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांना तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अतीतचे तत्कालीन विकास अधिकारी, शाखाप्रमुख व संलग्न निसराळे वि .का .स .सेवा सोसा. चे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव तसेच कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांचे कर्जास जामीन असलेले जामीनदार व साक्षीदार यांचे लेखी व तोंडी म्हणणे ऐकुन अहवाल सादर केला आहे. यास अनुसरून कर्जदार कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांचे  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा- अतीत आणि संलग्न निसराळे वि .का .स .सेवा सोसा. खात्यावर झालेले व्यवहार बँक धोरणानुसारच झालेचे निष्पन्न झाले आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी दिनांक २४ जून २०२२ रोजी तक्रारी अर्ज तथ्यहीन असलेचे आणि तक्रारी अर्ज निकाली काढलेबाबत तक्रारदार यांना परस्पर कळविलेले आहे.

सहकार खात्याच्या सखोल चौकशीअंती तक्रारी अर्ज तथ्यहीन असलेचे आणि तक्रारी अर्ज  निकाली काढलेबाबत तक्रारदार यांना कळविले असतानाही तक्रारदार सदरची कर्ज प्रकरणं बोगस असल्याचा कांगावा करत आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मेडिया आणि वृत्तपत्र माध्यमांद्वारे चुकीची व खोटी माहीती प्रसारित करून दिशाभूल करत आहेत. बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून कै. लक्ष्मण पांडुरंग घोरपडे यांना सातारा जिल्हा बँकेकडून झालेला कर्ज पुरवठा नियमानुसारच व बँक धोरणानुसारच झाला असलेचे आणि यापुढे तक्रारदार बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांनी अशा प्रकारची बँकेची व संस्थेची बदनामी केलेस बँक योग्य ती कायदेशिर कारवाई करणार असलेचे बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांनी या पत्रकाद्वारे कळविले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!