google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडा

शुभमन गिल अन् सारा तेंडुलकरने एकमेकांना केलं अनफॉलो…

टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्यातील प्रेमप्रकरण दोन वर्षांपूर्वी समोर आले होते. मात्र आता दोघांच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरु लागली आहे. यामागचे कारण सांगितले जात आहे की, ‘शुभमन गिल आणि साराने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते.’

दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यावर प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेल्या आणि या दौऱ्यावर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडणाऱ्या शुभमन गिलने एक इंस्टा पोस्ट केली होती, ज्यामधून त्याला भूतकाळ पूर्णपणे विसरायचा आहे असे दिसून येते होते. विशेष म्हणजे, शुभमनने एका फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या भविष्याशी एकनिष्ठ आहे, भूतकाळाशी नाही.” या पोस्टवर सर्व मुलींच्या कमेंट येत आहेत.

वास्तविक, झिम्बाब्वेमध्ये (Zimbabwe) शानदार कामगिरी केल्यानंतर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्याबद्दल ट्रेंड आला होता. कदाचित त्यामुळेच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले असेल. शुभमन गिल किंवा सारा तेंडुलकर या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. 2019 च्या आयपीएल दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

दुसरीकडे, जून 2019 मध्ये शुभमन गिलने (Shubman Gill) रेंज रोव्हर खरेदी केली. यानंतर साराने शुभमनचे अभिनंदन केले होते. यावर गिलने खूप खूप धन्यवाद म्हटले होते. त्याचवेळी हार्दिक पांड्याने लिहिले की, तिच्याकडून मोस्ट वेलकम. मात्र, आज या सर्व कमेंट्स तुम्हाला त्या पोस्टवर दिसणार नाहीत, कारण त्या हटवण्यात आल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!