National Games 2023 Medals Table:
ऑलिम्पिकपासून प्रेरणा घेतलेल्या भारतातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गोव्यात शुभारंभ झाला आहे. गोव्यातील म्हापसा, मडगाव, पणजी, फोंडा आणि वास्को या पाच शहरात सध्या विविध स्पर्धा सुरु आहेत. 28 राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ (SSCB) मधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गोवा इतिहासात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहे.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र 36 पदकांसह तालिकेत अव्वल असून, गोवा सहा पदकांसह बाराव्या स्थानी आहे.
महाराष्ट्र – ११ सुवर्ण, १२ रौप्य, १३ कांस्य – (एकूण ३६ पदकं)
हरियाणा – १० सुवर्ण, ०३ रौप्य, ०६ कांस्य – (एकूण १९ पदकं)
सेवादल – ०६ सुवर्ण, ०५ रौप्य, ०२ कांस्य – (एकूण १३ पदकं)
कर्नाटक – ०३ सुवर्ण, ०३ रौप्य, ०३ कांस्य – (एकूण ०९ पदकं)
पंजाब – ०३ सुवर्ण, ०२ रौप्य, ०५ कांस्य – (एकूण १० पदकं)
आसाम – ०३ सुवर्ण, ०१ रौप्य, ०२ कांस्य – (एकूण ०६ पदकं)
तर,
गोवा – ०१ सुवर्ण, ०२ रौप्य, ०३ कांस्य – (एकूण ०६ पदकं)
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10,000 हून अधिक खेळाडू विविध 43 खेळांमध्ये सहभागी झाले आहेत. यात पारंपारिक मल्लखांब, खो खो आणि कबड्डी यासारख्या देशी खेळांचाही समावेश आहे.
स्काय मार्शल आर्ट्स, रोलबॉल, सेपकटक्रा, कलरीपयट्टू, पेनकॅक सिलाट आणि मिनी गोल्फ या खेळांना यावर्षी स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे.