google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडा

RCB vs DC: दिल्लीने RCBकडून हिसकावला विजय

IPL 2025 RCB vs DC : केएल राहुलचा विजयी षटकार आणि दिल्लीने आरसीबीचा ६ विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने कमालीच्या गोलंदाजीवर सामना आपल्या बाजूने वळवला होता, पण केएल राहुल आपल्या खेळीच्या जोरावर संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. राहुल या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी आला होता. राहुलने ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटतकारांसह ९३ धावा करत नाबाद परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने त्याला ३८ धावा करत चांगली साथ दिली.

आरसीबीने (RCB vs DC) प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या होत्या. तर दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. केएल राहुलच्या खेळीसह दिल्लीने १७.५ षटकांत १६९ धावा करत ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. यासह दिल्लीने आयपीएलमधील एकाही सामन्यात पराभूत न होता सलग चौथा सामना जिंकला आहे.

आरसीबीने (RCB vs DC) प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या होत्या. तर दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. केएल राहुलच्या खेळीसह दिल्लीने १७.५ षटकांत १६९ धावा करत ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. यासह दिल्लीने आयपीएलमधील एकाही सामन्यात पराभूत न होता सलग चौथा सामना जिंकला आहे.

१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. फाफ डू प्लेसिसला यश दयालने फक्त २ धावांवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांना स्वस्तात बाद केले. फ्रेझरने ६ चेंडूत ७ धावा केल्या. अभिषेक पोरेललाही फक्त ७ धावा करता आल्या. कर्णधार अक्षर पटेलही मोठी खेळी करू शकला नाही.

३० धावांवर ३ विकेट गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या दिल्लीला केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी उत्तम प्रकारे सावरलं. विशेषतः राहुलने मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी केली आणि दिल्लीला पराभवातून बाहेर काढत चांगली फलंदाजी केली. क्रीजवर सेट झाल्यानंतर राहुलने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राहुलने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने ५३ चेंडूत ९३ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, राहुलने ७ चौकार आणि ६ षटकार मारले. स्टब्सने २३ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. राहुलने एक शक्तिशाली षटकार मारत दिल्लीला या हंगामात सलग चौथा विजय मिळवून दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!