भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय…
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. चेन्नईच्या मैदानात फिरकी गोलंदाजांना मदत मिळते, तसच काहीसं आजच्या सामन्यात झालं. भारताच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. टीम इंडियाच्या फिरकी तिकडीपुढे कांगारू अक्षरशः ढेपाळले. वन डे विश्वचषक २०२३ स्पर्धेत रविवारी (८ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर सीमित राहिला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला.
ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ३०० चेंडूत केवळ २०० धावा करायच्या आहेत. मात्र, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. अशा स्थितीत भारताला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.