google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडादेश/जग

Google Doodle: ‘कोण’ होत्या किट्टी ओ’नील?

Google Doodle: द फास्टेस्ट वूमन इन द वर्ल्ड (The Fastest Woman In The World) म्हणजेच ‘जगातील सर्वात वेगवान महिला’ हा क्राऊन ज्यांना देण्यात आला होता, त्या किट्टी ओ’नील (Kitty O’Neil) यांची आज 77 वी जयंती आहे. किट्टी या अमेरिकन स्टंट परफॉर्ममर, डेअरडेव्हिल आणि रॉकेट पॉवर्ड व्हेइकल ड्रायव्हर होत्या. त्यांला लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते. आज त्यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

किट्टी ओ’नील यांचा जन्म 24 मार्च 1946 रोजी कॉर्पस क्रिस्टी टेक्सास येथे झाला. त्यांची आई अमेरिकन होत्या तर वडिल हे आयरिश होते. किट्टी ओ’नील या जेव्हा काही महिन्यांच्या होत्या, तेव्हा त्यांना अनेक आजार झाले ज्यामुळे त्यांनी श्रवणशक्ती गमावली. त्यानंतर त्यांनी कम्युनिकेशनचे अनेक प्रकार शिकून घेतले. लिप रिडींग देखील त्या करत होत्या. किट्टी यांनी यांना डायव्हिंगची आवड निर्माण झाली, परंतु मनगटाची दुखापत आणि आजारपणामुळे त्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकत नव्हत्या.

किट्टी ओ’नील यांनी वॉटर स्कीइंग आणि मोटारसायकल रेसिंग यांसारख्या हाय-स्पीड स्पोर्ट्स खेळण्यास सुरुवात केली. हेलिकॉप्टरमधून उडी मारणे यासारखे स्टंट्स त्या करत होत्या. त्यांनी द बायोनिक वुमन (1976), वंडर वुमन (1977-1979), आणि द ब्लूज ब्रदर्स (1980) या चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील स्टंट परफॉर्म केले. स्टंट अनलिमिटेड या हॉलिवूडमधील टॉप स्टंट परफॉर्ममर या संस्थेमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. किट्टी ओ’नील या 1976 मध्ये द फास्टेस्ट वुमन अलाइव्ह (The Fastest Woman Alive) म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

kitty-oneil

गूगलनं किट्टी ओ’नील यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त खास डूडल केलं आहे. हे डूडल वॉशिंग्टन डीसी येथील गेस्ट आर्टिस्ट मीया त्जियांग यांनी डिझाइन केलं आहे. या डूडलमध्ये किट्टी ओ’नील यांचे चित्रपट दिसत आहे. त्यांच्या हातात हेल्मेट देखील दिसत आहे. या डूडलमध्ये हेलिकॉप्टर देखील आहे. या हेलिकॉप्टरमधून एक व्यक्ती खाली पडताना दिसत आहे. तसेच डूडलमध्ये एक रेसिंग कार देखील आहे.

सायलंट व्हिक्ट्री : किट्टी ओ’नील स्टोरी (Silent Victory: The Kitty O’Neil Story) हा 1979 मध्ये रिलीज झालेला चित्रपट किट्टी ओ’नील यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!