google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

समाजविरोधी आणि देशद्रोही मोदी परिवाराचा भाग : अमित पाटकर

पणजी :
दिगंबर कामत यांच्यासारखे संविधानाचे हत्यारे, प्रज्वल रेवण्णासारखे महिलांचे लैंगिक शोषण करणारे, के. सुधाकरसारखे काळा पैसा जमा करणारे मोदी का परिवाराचे भाग आहेत. अशा समाजकंटकांना आणि देशद्रोही लोकांना दिलेले प्रत्येक मत नरेंद्र मोदींना जाते. ही भाजपची गॅरंटी आहे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ज्यांना ‘विश्वास घातकी’ असे संबोधले होते, त्या गॉडमन दिगंबर कामत यांना भाजपने निर्लज्जपणे भाजपात प्रवेश दिला. आज त्यांच्यासारखेच अनेक दगाबाज आणि फसवणूक करणारे भाजपमध्ये आहेत. संकल्प आमोणकर, रोडॉल्फो फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा आणि इतर पक्षबदलू घटकांनी संपूर्ण भाजप संघटनाच हायजॅक केल्यामुळे तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांना आता कोणी वालीच राहिलेला नाही, असे अमित पाटकर म्हणाले.

जेडीएस उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या चारित्र्याबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना इशारा देऊनही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला आणि रेवण्णा यांना दिलेले मत मोदींनाच असेल असे लोकांना आवाहन केले, असे अमित पाटकर म्हणाले.

लैंगिक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रातील भाजप सरकारने प्रज्वल रेवण्णा यांना भारतातून पळून जाण्याची संधी दिली. प्रज्वल रेवण्णा 27 एप्रिल 2024 रोजी बेंगळुरूहून जर्मनीला जाणाऱ्या विमानात चढला, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीमुळे भारतातील काळा पैसा संपेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील भाजपच्या लोकसभा उमेदवाराला निवडणूक आयोगाने 4.8 कोटी रोख रकमेसह कसे पकडले? असा सवाल अमित पाटकर यांनी केला आहे.

सध्या मोदी परिवारात असलेल्या संविधानाचे हत्यारे, महिलांचे लैंगिक शोषण करणारे आणि काळा पैसा जमा करणाऱ्यांवर बोलण्याचे धाडस करावे असे माझे भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना आव्हान आहे. या सगळ्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली आहे.

7 मे 2024 रोजी गोवा भाजपला कायमचा धडा शिकवेल. अहंकारी आणि हुकूमशाही मोदी सरकार 4 जून 2024 ला नक्कीच पडेल, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!