google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

विद्यानगर – सैदापूर रस्त्यावरील भीषण अपघात कॅमेरात कैद

कराड :

शहराजवळील विद्यानगर- सैदापूर येथे यश संकुल समोर रात्री भीषण अपघात झाला. एसजीएम काॅलेजच्या समोर झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराने रस्त्यावर चालणा-या तरुणाला उडवले. अपघाताची सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या अपघातातील जखमीवर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. समाधान विठ्ठल खरात असे जखमीचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विद्यानगर- सैदापूर येथे काॅलेज परिसर मोठा आहे. येथे जवळपास 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात. येथील एसजीएम काॅलेज समोर रात्री 11 वाजून 7 मिनिटांनी दोघेजण चालत निघाले होते. तेव्हा कराडकडून काॅलेजकडे जाणाऱ्या मार्गावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने समाधान खरात जोराची धडक दिली. या धडकेत समाधान रस्त्यावर कोसळले.

समाधान खरात यांना दुचाकीने धडक दिल्याने तेथे असलेले परिसरातील नागरिकांनी तात्काळ घेतली. यावेळी जखमीला उठविण्याचे काम केले, परंतु त्यांना भोवळ आली होती. अखेर नागरिकांच्या सोबतीने त्यांना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल रात्री एसजीएम काॅलेजमध्ये युवा महोत्सामुळे विद्यार्थ्यांची या रस्त्यावर गर्दी होती. या मार्गावर गेल्या महिन्याभरात 17 ते 18 किरकोळ अपघात झालेले आहेत. तेव्हा या मार्गावर उपाययोजना करण्याकडे का दुर्लक्ष केले जाते असा प्रश्न स्थानिकांच्याकडून केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!