google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

जिल्ह्यातील वीज वितरणचे 2700 कर्मचारी आजपासून संपावर

सातारा (महेश पवार) : 

महावितरण ला समांतर अशा धोरण अंमलबजावणीमुळे सातारा मंडळातील वीज वितरण कंपनीचे कायमस्वरूपी असणारे 2700 अभियंते अधिकारी कर्मचारी आज रात्रीपासून संपावर जात आहेत.महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने मंगळवार मध्यरात्रीपासून बहात्तर तासाचा संप पुकारला आहे त्यामुळे जर पुढील 72 तासांमध्ये जर कुठे वीजपुरवठा खंडित झाला तर तो पूर्ववत करताना वीज वितरणच्या यंत्रणेला मोठी कसरत करावी लागणार आहे

दरम्यान नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्ध पातळीवर 24 तासांच्या राहणार आहे काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन सातारा वीज वितरण विभागाची अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे

महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संचालक संजय ताकसांडे यांनी घेतलेले आढावा बैठकीत परिमंडल कृती आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये विविध उपाय योजना विभाग मंडळ परिमंडल स्तरावर 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत नियंत्रण कक्ष युद्ध पातळीवर तयार करण्यात आला असून दर तासाला वीज पुरवठ्याच्या स्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी मुख्यालयाला अहवाल सादर करणार आहेत सातारा जिल्ह्यातील अभियंता वीज कर्मचारी अधिकारी असे 2700 कर्मचारी खाजगीकरणाच्या विरोधात संपावर जात असल्याने पुढील 72 तास वीज पुरवठ्याचा खोळंबा झाल्यास त्याची तातडीची दुरुस्ती होऊ शकेल की नाही याबाबत नागरिकांच्या मध्ये साशंकता व्यक्त होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम असून या संपाचे परिणाम सातारा जिल्ह्याला विशेषता सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती त्यातल्या त्यात शिरवळ तासवडे सातारा एमआयडीसींना फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त होत आहे जर तसे घडल्यास कोट्यावधी रुपयांची लघुउद्योजकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे

संपामध्ये महावितरणचे कर्मचारी बाह्य स्त्रोत कर्मचारी महावितरणचे अप्रेंटिस विद्युत सहाय्यक प्रशिक्षणार्थ अभियंता देखभाल दुरुस्ती करणाऱ्या निवड सूची वरील कंत्राटदारांचे कर्मचारी हे सहभागी झाले असून सातारा जिल्ह्यात गौतम गायकवाड यांनी वीज पुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या केले आहेत बाह्य स्त्रोत कंत्राट तत्वावर सक्रिय असलेले बाराशे कर्मचारी सुद्धा या संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे संप काळामध्ये सुरळीत वीज पुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवड सूचीवर असलेल्या कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्री मनुष्यबळ वाहनासह संबंधित कार्यालयामध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आले असून महावितरणच्या मंडल प्रमुखांकडून उपकेंद्रांसाठी वितरण रोहित्र ऑइल विस्तारा केबल स्वीच काम फिडर पिलर्स डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस इत्यादी साधनसामग्री पुरविण्यात आली आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!