google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

‘१ टी.एम.सी. बोंडारवाडी धरण प्रकल्पासाठी सर्व्हेक्षण करा’

सातारा (महेश पवार) :

जावली तालुक्यातील ५४ गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्याचा चंग बांधलेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून १ टी.एम.सी.चे बोंडारवाडी धरण बांधण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व्हेक्षण तातडीने करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे. दरम्यान, बोंडारवाडी प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतल्याद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. फडणवीस यांचे आभार मानले असून जनहितासाठी बोंडारवाडी प्रकल्प लवकरच मार्गी लावला जाईल, असा शब्द त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला.

मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार विधानभवनात उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत महत्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीला आ. शिवेंद्रसिंह यांच्यासह डॉ. भारत पाटणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मोहन कासुर्डे, संतोष गोटल, चैतन्य दळवी, आदिनाथ ओंबळे, संतोष ओंबळे, जगन्नाथ जाधव, हरिभाऊ शेलार, बंडोपंत ओंबळे आदी ग्रामस्थांसह जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव कपूर, प्रकल्प समन्वयचे सचिव मोहिते, पुणे कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लक्षवेधी प्रश्न मांडून या प्रकल्पाचे सर्व्हेक्षण, ट्रायलपीट आदी बाबींसाठी जलसंपदा विभागामार्फत निधी उपलब्ध करावा आणि ५४ गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटावा, यासाठी हा संपूर्ण प्रकल्प जलसंपदा विभागामार्फतच केला जावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आज मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून फडणवीस यांनी या प्रकल्पासंदर्भात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जावली तालुक्यातील ५४ गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे सांगून १ टी.एम.सी. क्षमतेचे बोंडारवाडी धरण उभारण्यासाठी तातडीने सर्व्हेक्षण सुरु करावे आणि त्यासाठी लागणार निधी जलसंपदा विभागामार्फत उपलब्ध करावा, अशा सूचना फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व्हेक्षण होत नसल्याने बोंडारवाडी प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते मात्र आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा आणि फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय झाला असून या प्रकल्पाचे काम पुढे सरकण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. बोंडारवाडी धरणाबाबत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे जावलीकरांनी फडणवीस आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!