google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

अतिवृष्टीच्या काळात घडले जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतचे दर्शन

सातारा (महेश पवार) :

अतिवृष्टीच्या काळात सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अत्यंत तत्पर व अलर्ट राहून गतिमान ठेवलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे सातारा जिल्हावासियांच्यात एक सकारात्मक संदेश गेला आहे. भुस्खलन दरड कोसळणे इ. नैसर्गिक आपत्ती पासून मोरेवाडी व सातारा जिल्हयातील दरड प्रवण भुस्खलन व पूरप्रवण क्षेत्रातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका विभाग, विदयुत महामंडळ व सर्व विभागांचा वेळोवेळी बैठक व व्हि.सी. द्वारे आढावा घेऊन नागरिकांचे स्थलांतर करणे, सोयीसुविधा पुरविणे व आवश्यक बचावात्मक उपाययोजना करून घेणे यातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यतत्पर व संवेदनशील स्वभावाचे दर्शनच घडले.

सन 2019 साली सातारा तालुक्यात सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टीमुळे जमीन भुस्खलन होऊन मौजे मोरेवाडी ता सातारा येथील डोंगर माथ्यावर भेगा पडलेल्या होत्या. त्यामुळे सन 2021 मध्ये आलेल्या जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षण अहवालानुसार नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये नागरिकांची होणारी जिवीत हानी व वित्त हानी टाळणेसाठी सदर गावातील 18 कुटुंबांचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले होते. त्यांचे तात्पुरते स्थलांतर मौजे मोरेवाडी येथील कटकाचा माळ या ठिकाणी बांधण्यात आलेल्या तात्पुरता निवारा पत्राशेड याठिकाणी करण्यात आलेले आहे.


जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या सूचनानुसार साताराचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले व तहसिलदार राजेश जाधव यांनी मोरेवाडी गावातील दरड प्रवण क्षेत्रास प्रत्यक्ष भेट दिली. शासनातर्फे मौजे मोरेवाडी येथील कटकाचा माळ या ठिकाणी बांधण्यात आलेल्या तात्पुरता निवारा पत्राशेडची पहाणी केली असता, या ठिकाणी पाणी, वीज इ. भौतीक सोयी सुविधांचा अभाव असल्याचे निर्दशनास आले. या बाबी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्दशनास आणून देताच त्यांनी मोरेवाडी येथील स्थलांतरित कुटुंबाची कोणतीही गैरसोय होणार नाही याकरिता वैयक्तिक लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणेबाबत सूचना दिल्या. याची अचूक अंमलबजावणी करत उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार राजेश जाधव, गट विकास अधिकारी अनिल वाघमारे, मंडळ अधिकारी परळी श्रीमती माधवी गोरे यांच्यासह सर्व टीम कामाला लागली. उपअभियंता महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी यांनी सतत पडणा-या पाऊसामध्येही उपस्थित राहून दोन दिवसांत १० विजेचे खांब उभे करून तात्काळ वीजपुरवठा सुरू केला. तसेच गावातील झ- यापासून तात्पुरते निवारा शेडपत्रापर्यंत पिण्याचे पाण्याची सोय केली आहे.


जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील भुस्खलन दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या कायमस्वरुपी स्थलांतराच्या उपाय योजनांना एका बाजूला गती देत असताना त्यांनी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजनांमध्येही कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी स्वत: केलेला पाठपुरावा हे त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि कार्यतत्परतेचे उत्तम उदाहरण आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!