‘ब्रिजभुषण सिंगला तात्काळ अटक करून कठोर शासन करा’
पाटण (महेश पवार) :
महिला कुस्ती पट्टूंवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या नराधम ब्रिजभुषणचा व या विरोधातील कुस्ती पट्टूंचे आंदोलन अमानुषपणे चिरडणाऱ्या मोदी सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीने पाटण येथे पायी मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. या कुस्तीपटू महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपचा अत्याचारी खासदार ब्रूजभूषण सिंग याला तात्काळ अटक करून त्याला कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन पाटण तहसीलदार यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पाटण तालुक्यातील कुस्ती पट्टू, युवक, महिला, युवती, खेळाडू व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता.
यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी सांगितले की गेल्या ३६ दिवसांपासून महिला कुस्तीपट्टूचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. या आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांवर दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमानवी आणि जुलमी कारवाई केली. आंदोलनकर्त्या महिला व त्यांच्या समर्थकांना फरफटत नेऊन डांबून ठेवण्यात आले. ही कारवाई होत असताना दीड किलोमीटर अंतरावर नवीन संसद भवनाचा उदघाटन सोहळा अगदी थाटामाटात सुरू होता. त्याच दरम्यान लोकशाहीच्या मोठ-मोठ्या आणाभाका देखील घेतल्या जात होत्या. एकीकडे बेटी बचाव-बेटी पढाव ची घोषणा द्यायची आणि दुसरीकडे देशासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळून पदके जिंकणाऱ्या मुलींवर अमानुष पद्धतीने कारवाई करायची आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याना संरक्षण द्यायचे.
मोदींच्या या ढोंगी सरकारचा पाटण तालुक्यातील जनता निषेध करत आहे. भाजपा सरकार त्यांच्या पक्षाचा खासदार ब्रिजभूषणला वाचविण्यासाठी हे हुकूमशाही वृत्तीचे, महिला विरोधी कृत्य करत आहे असा आरोप आंदोलकांनी केला. फॅसिस्ट मोदी सरकारने अशी कारवाई करून लोकशाहीची लक्तरे वेशीला टांगली आहेत. आम्ही दिल्ली पोलीस आणि फॅसिस्ट मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो. येणाऱ्या काळात जनता रस्त्यावर विरोध प्रदर्शन करू आणि भाजपा सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू असा विश्वास आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पाटण नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड.अविनाश जानुगडे , शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष सुरेश पाटील, मनसे पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर , राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ.स्नेहल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष गुरुदेव शेडगे, वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा सौ.रेखाताई जाधव, पंचायत समिती माजी सदस्या सौ.मिलन सय्यद, युवक उपाध्यक्ष सम्राट घेवारी, युवक उपाध्यक्ष योगेश महाडिक, वस्ताद विजय घाडगे, दिनकरराव धामणकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप लोहार, विश्वजीत पाटणकर, मनोहर यादव(सर), डांगे सर, यिन अध्यक्ष किशोर लोहार, प्रहारचे पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे, सूरज पंधारे,अष्पाक शैख, प्रवीण भीसे, सत्यजितसिंह पाटणकर युवामंचचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्थांचे आजी/माजी संचालक, आजी/माजी नगरसेवक, नगरसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.