लाच घेताना वकिलाला रंगेहाथ पकडले
सातारा (महेश पवार) :
साताऱ्यातील जिल्हा न्यायालयातील वकील लाच स्विकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. तब्बल 2 लाख रुपयांची मागणी केल्यानंतर तक्रारदाराकडून 1 लाख रुपये स्विकारताना वकीलाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे वकील क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. विलास बाळकृष्ण कुलकर्णी (रा. सातारा जिल्हा कोर्ट) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेचा दावा जिल्हा कोर्टात सुरू आहे. दिवाणी न्यायालयातील केसचा निकाल संस्थेच्या बाजूने लावण्याकरिता लोकसेवकावर प्रभाव पाडून खासगी वकिलाने 2 लाख रूपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. त्यापैकी 1 लाख रूपये स्विकारताना खासगी वकिल विलास बाळकृष्ण कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल निलेश येवले, तुषार भोसले, शितल सपकाळ यांनी सापळा रचून कारवाई केली.