सातारा
उरमोडीचा ‘तो’ रस्ता शिवेंद्रसिंहराजेंच्या पुढाकाराने दुरुस्त….
सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील परळी खोर्यातील उरमोडी धरणाकडे जाणाऱ्या भोंदवडे फाटा ते अंबवडे बुद्रुक गावातून जाणारा रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले होते.
दरम्यान राष्ट्रमत ने बातमी प्रकाशित करताच आमदार शिवेंद्रसिंहराजेनी बातमीची दखल घेत गणेश चतुर्थीच्या आधी रस्ता पुर्ण करण्याच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करताच बांधकाम विभागाने रस्त्यांचे काम करत भोंदवडे फाटा ते अंबवडे रस्ता दुरुस्त केला.
दरम्यान परिसरातील गणेश भक्तांनी देखील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करून दिल्याबद्दल आभार मानले.