‘फळकूट’ दादांच्या बॅनरबाजीत बुडाला पालिकेचा लाखोंचा महसूल…
सातारा (प्रतिनिधी) :
सातारा शहर हे ऐतिहासिक असून या शहरात येणारा व्यक्ती कधीच रस्ता चुकत नाही , मुळात शहरात बघितलं तर वरचा रस्ता, खालचा रस्ता, आणि मधला रस्ता यात भर पडते ती शहरात झालेली अतिक्रमणे आणि फळकुट दादांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींच्या बॅनर ची , हे फळकुट दादा पालिकेच्या ठरवून दिलेल्या जागेवर परवानगी घेऊन बॅनर न लावता , शहरत कुठेही बेकायदेशीर बॅनर लावताना दिसतात.
मात्र पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करताना दिसत नाही. यामुळे पालिकेचा दर वर्षी लाखो रुपये चा महसूल बुडत असून , बेकायदेशीर बॅनर लावणार्या वर प्रति दिवस एक हजार दंड असताना देखील तो वसूल केला जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
बेकायदेशीर बॅनर लावणार्या फळकूट दादांचं आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मध्ये आर्थिक देवाण-घेवाण आहे की काय ? यामुळेच संबंधितांवर कारवाई होत नाही अशी शंका सर्वसामान्य सातारकरांमध्ये आहे. यामुळे पालिकेचा महसूल बुडव्या फळकुट दादा आणि संबंधित अधिकारी यांच्यावर मुख्याधिकारी बापट काय कारवाई याकडे सर्व सातारकरांचे लक्ष लागले आहे.
फळकूट दादांची पालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई केली ती पण नावालाच , मात्र एरवी एखादा शेतकरी रस्त्यावर भाजी विकताना दिसला तर त्याची भाजी आणि वजन तांगडे उचलणार्या पोलीसांना रस्त्यावर अपघात होईल असे बॅनर लावले असताना देखील त्या फळकूट दादांवर सातारा शहर पोलीस व शाहूपुरी पोलीसांनी का कारवाई केली नाही? याचं गुढ काय? सातारा पोलीस त्या फळकूट दादांवर कारवाई ची धमक दाखवणार का?