google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेची सातारा कार्यकारणी जाहीर

सातारा :

महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी व तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


व्हाईस ऑफ मीडिया ही 50 ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना असून भारतातील 17 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाकाळात 136 पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ने या 136 पत्रकारांच्या 150 पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले. पत्रकारांची हीत जपणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये न अडकता पत्रकारिता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून घडत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.


सातारा जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे ः- जिल्हा कार्याध्यक्ष ः संतोष नलवडे (सातारा), जिल्हा कार्याध्यक्ष ः संदिप पवार (कोरेगाव), जिल्हा उपाध्यक्ष ः सुनिल परीट (कराड), जिल्हा उपाध्यक्ष ः नानासाहेब मुळीक (फलटण), जिल्हा उपाध्यक्ष ः राजेश पाटील (ढेबेवाडी), जिल्हा उपाध्यक्ष ः रमेश पल्लोड (महाबळेश्वर), जिल्हा सरचिटणीस ः सकलेन मुलाणी (कराड), जिल्हा सहसरचिटणीस ः अभिजीत खुरासणे (महाबळेश्वर), खजिनदार/ कोषाध्यक्ष : विनोद खाडे (खटाव), जिल्हा कार्यवाहक ः संदिप कुंभार (मायणी), जिल्हा कार्यवाहक ः संजय दस्तुरे (महाबळेश्वर), जिल्हा संघटक ः चंद्रशेखर जाधव (वडूज), जिल्हा संघटक ः प्रशांत डावरे (लोणंद), जिल्हा प्रवक्ता – मोहन बोरकर (लोणंद), जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – युवराज मस्के (कराड)


सातारा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष निवडी पुढीलप्रमाणे ः-
सातारा – संजय कारंडे, सातारा शहराध्यक्ष – शुभम बोडके, कराड- अमोल टकले, पाटण- योगेश हिरवे, खंडाळा- राहीद सय्यद, फलटण- विनायकराव शिंदे, खटाव- राजीव पिसाळ,
कोरेगाव – तेजस लेंभे, महाबळेश्वर – अजित जाधव, जावली – संदिप गाढवे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!