
उरमोडी नदी काठावरील ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा…
सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील उरमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बुधवारी दिनांक 31 जुलै रोजी दुपारी दोन वाजता धरणाचे वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून व विद्युत ग्रहामधून सुमारे 5000 क्युसेक्स पाण्याचा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा उरमोडी पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
उरमोडी धरण परिसरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याची आवक वाढल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
दरम्यान उरमोडी नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे परळी व आंबवडे बुद्रुक यादरम्यानचा जुगाई देवी मंदिराजवळील पुल व उपळी शहापूर दरम्यान चा बंधारा वरील रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सध्या नागठाणे माजगाव यादरम्यान चा पुल सध्या पाण्याखाली गेला असून नदी काठावरील गावांना उरमोडी धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.