सज्जनगडावर सुदर्शन याग
सातारा (महेश पवार) :
सज्जनगडवर रामदास स्वामी संस्थानच्या वतीने सुदर्शन याग (यज्ञ) आयोजित करण्यात आला. हा यज्ञ तीन दिवस सुरु होता. विश्व कल्याणासाठी या यज्ञाचे आयोजन केल्याचे माहिती रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष भुषण स्वामी यांनी दिली.
गुरुपौर्णिमेच्या दुसऱया दिवसांपासून श्री क्षेत्र सज्जनगडावर सुदर्शन यागा स प्रारंभ झाला. हा याग विश्वशांतीसाठी करण्यात आला असून या कार्यक्रमात सज्जनगड पाठशाळेचे आजी माजी विद्यार्थी सहभागी होते. तीन दिवसांच्या कार्यक्रमाचे यजमान पद श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष अधीकारी दुर्गा प्रसाद स्वामी व वासंती स्वामी यांनी स्विकारले होते.
या कार्यक्रमाचे पौरोहित्य आचार्यपदी संतोष देशपांडे पुणे हे पदी होते. व सर्व माजी विद्यार्थी सहभागी होते. दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो हे वर्ष 11 वे आहे अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापक तुषार पाठक यांनी दिली. यावेळी रामदास स्वामी संस्थांनचे विश्वस्त सु. ग. स्वामी उर्फ बाळासाहेब स्वामी, अभीराम स्वामी हे उपस्थित होते.