google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

भारतात BMW ची ‘हि’ विशेष गाडी लाँच 

नवी दिल्ली :

BMW मोटोर्राड इंडियाने आज भारतात फर्स्‍ट–एव्‍हर BMW G 310 RR लाँच केली. भारत हा अत्‍यंत यशस्‍वी BMW 310 मॉडेल सिरीजच्‍या तिस-या व आधुनिक सदस्‍याचे स्‍वागत करणारा पहिला देश आहे. ही बाइक आजपासून BMW मोटोर्राड इंडिया डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

BMW मोटोर्राड आणि कोऑपरेशन पार्टनर TVS मोटर कंपनी यांनी संयुक्‍तपणे BMW G 310 RR विकसित केली आहे. BMW G 310 RR चे उत्‍पादन भारतात स्‍थानिक पातळीवर करण्‍याल आहे, तर TVS मोटर कंपनी, होसूरने BMW G 310 RR व G 310 GS चे उत्‍पादन केले आहे.

श्री. मार्कस म्‍यूलर-झॅम्‍ब्रे, हेड ऑफ रिजियन एशिया, चीन, पॅसिफिक अॅण्‍ड आफ्रिका BMW मोटोर्राड येथील म्‍हणाले, ”5 वर्षांच्‍या आत G 310 R व G 310 GS अत्‍यंत लोकप्रिय बाइक्‍स बनल्‍या आहेत आणि जगभरात त्‍यांना उच्‍च मागणी आहे. तिस-या सदस्‍याचे सादरीकरण R – रोडस्‍टर, GS – अॅडवेन्‍चर बाइक आणि आता फर्स्‍ट–एव्‍हर BMW G 310 RR – अस्‍सल रोड रेसिंग स्‍पोर्ट बाइक यांच्‍यासह G 310 रेंज वैविध्‍यपूर्ण करते. BMW G 310 RR’s कार्यक्षमता, एजिलिटी, प्रीसिशन आणि रेसिंग-टू-गो फ्लेअर तुमच्‍यामध्‍ये रेसिंग वृत्ती जागृत करतात. आम्‍हाला BMW मोटोर्राडसाठी झपाट्याने विकसित होत असलेल्‍या बाजारपेठांपैकी एक भारतात पहिल्‍यांदाच ही बाइक लाँच करण्‍याचा आनंद होत आहे.”

श्री. विक्रम पावाह, प्रेसिडण्‍ट, BMW ग्रुप इंडिया म्‍हणाले, ”फर्स्‍ट-एव्‍हर BMW G 310 RR ही सब-500 वर्गामधील सर्वात स्‍पोर्टी व सर्वात हवीहवीशी वाटणारी स्‍पोर्टस् बाइक आहे. या बाइकमध्‍ये मूळ रोड रेसिंग जीन्‍स सामावलेले आहेत, ज्‍यांनी लक्षवेधक स्‍पोर्टस् बाइक उत्‍साहींना डांबरी रस्‍त्‍यावर अमर्यादित अॅड्रेनालाइन रशचा अनुभव दिला आहे.

आकर्षक सुपरबाइक डिझाइन व आधुनिक टेक्‍नोलॉजीचे संयोजन असलेली ही बाइक अद्वितीय राइडिंग मशिन असण्‍यासोबत रेस ट्रॅक्‍स व शहरातील रस्‍त्‍यांवर तुमची सर्वोत्तम सोबती देखील आहे. RR सह तुम्‍ही आव्‍हान स्‍वीकारणे कधीच थांबणार नाही.”

फर्स्‍ट एव्‍हर BMW G 310 RR  दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सादर करण्‍यात येईल.

एक्‍स-शोरूम किंमत पुढीलप्रमाणे –
BMW G 310 RR –                     INR 285,000
BMW G 310 RR स्‍टाइल स्‍पोर्ट –           INR  299,000

G 310 RR  मध्‍ये अमर्यादित अॅड्रेनालाइन रशचा अनुभव देण्‍यासाठी S 1000 RR चे DNA समाविष्‍ट आहे आणि BMW मोटोर्राड स्‍पोर्ट बाइक्‍स समूहामध्‍ये प्रवेश करेल. शहरामध्‍ये चपळ व गतीशील, रस्‍त्‍यावर आत्‍मविश्‍वासपूर्ण व शक्तिशाली राइडचा अनुभव देईल.

सुलभ मालकीहक्‍कासाठी BMW इंडिया फायनान्शियल सर्विसेस फर्स्‍ट-एव्‍हर BMW 310 RR चे मालक बनण्‍याकरिता परिपूर्ण पॅकेज देत आहे. लाभांमध्‍ये कमी सुरूवातीचा भरणा, INR 3,999 पासून सुरू होणारे मासिक पेमेंट आणि इन्‍शुरन्‍स व अॅक्‍सेसरीजकरिता अर्थसाह्याचा पर्याय यांचा समावेश आहे.

संपूर्ण मन:शांतीसाठी BMW मोटोर्राड बाइक्‍स ‘तीन वर्षे, अनलिमिटेड किलोमीटर्स’साठी स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटीसह येतात. तसेच वॉरंटी आकर्षक दरांमध्‍ये चौथ्‍या व पाचव्‍या वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.
रोडसाइड असिस्‍टण्‍स, 24×7 365 दिवसांचे पॅकेज ब्रेकडाऊन व टोइंगच्‍या स्थितींमध्‍ये अधिक सेवा मिळण्‍याची खात्री देतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!