Facebook Down : ‘का’ झाले फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन?
Facebook Down : गेल्या काही वेळापासून फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) पूर्णपणे डाऊन झाले आहे. नेटकऱ्यांचे फेसबुक (Facebook) लॉग आऊट झाले असून लॉग करताना अडचणी येत आहेत. नेटकऱ्यांनी मंगळवारी (दि.5) रात्री 9 वाजल्यापासून या अडचणांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा अशा समस्यांना नेटकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान, सातत्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. फेसबुक वापरता येत नसल्यामुळे नेटकरी अस्वस्थ झाले आहेत.
हा DOS हल्लाही असू शकतो, असे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त करत आहेत. DOS अॅटॅकमुळेच फेसबुक डाऊन झाले असल्याचे गृहीत धरले जात आहे. अशावेळी रेच लोक एकाच वेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात. जे क्षमतेपेक्षा जास्त असते. यामध्ये अनेक फेक अकाऊंटचा समावेश असू शकतो.
…