google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

उदयनराजेंना आणखी एक धक्का; पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली शिवेंद्रसिंहराजे यांची भेट

सातारा (महेश पवार) :

सातारा लोकसभेचा उमेदवार कोण हे अजून निश्चित नसताना आणि एकीकडे उदयनराजेंना तिकीट मिळावं म्हणून उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत.

अशावेळी  शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी आज आमदार शिवेंद्रराजे यांची अचानक सुरुची या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या भेटी दरम्यान कमराबंद नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुरुषोत्तम जाधव आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भेटीने उदयनराजेंची डोकेदुखी वाढणार का ? काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे . यामुळे तिकीट नेमकं कोणाला मिळणार आणि कोण असणार महायुतीचा उमेदवार याकडे संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!