google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे:

भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषवलं होतं.

मुक्ता टिळक यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं पुढे त्या एमबीए देखील झाल्या. सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपनं त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!