बोगस कर्ज प्रकरणातील ‘त्या’ सचिवावर कारवाईस टाळाटाळ?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील जावली तालुक्यातील आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीच्या सचिवाने आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने 52 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण करत तब्बल 74 लाख 11 हजार 954 रुपयाची कर्ज काढून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा प्रकार उघडकीस आला.
यासंबंधी महेंद्र गोळे यांनी तक्रार दिल्यानंतर गणेश पोळके सहकारी संस्था लेखा परीक्षक यांना संबंधित सोसायटी ची कागदोपत्री तपासणी करत असताना ,५२ शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणी केल्याचं निष्पन्न झाले . यानंतर गणेश पोळके सहकारी संस्था लेखा परीक्षक यांनी सचिव अजित रांजणे यांच्या विरोधात मेढा पोलीसात तक्रार दिली असून , मेढा पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तक्रारदार यांनी संबंधी जिल्हा प्रमुख यांची भेट घेतली.
दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख यांनी एका आठवड्यात कारवाई करण्याच्या सूचना देऊन सुद्धा मेढा पोलिस पोलिसांनी कारवाई केली नाही ? नेमकं याप्रकरणी कारवाई करण्यास मेढा पोलीस का टाळाटाळ करतायंत ? आता जिल्हा पोलिस प्रमुख याप्रकरणी स्वतः लक्ष घालणार का ?
या प्रकरणातील प्रमुख मुद्दे
* अंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीच्या सचिवाने काढलेल्या बोगस कर्जामुळे शेतकरी पन्नास हजार अनुदानापासून वंचित …
*सचिवांच्या बोगस कर्जाचा शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा ?
* विकास सेवा सोसायटी चे संचालक मंडळांवर कारवाई होणार का ?
*राजकीय वरदहस्त असल्याने कारवाईला दिरंगाई ?
*पोलीस तक्रार असून देखील करतायंत टाळाटाळ?
*या बोगस कर्ज प्रकरणात सहभागी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ?