google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

53 व्या इफ्फीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा…

इफ्फी, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, चित्रपटांच्या माध्यमातून एकत्रितपणे  विविध देश आणि समाजातील प्रतिनिधींमध्ये  एक उत्साहवर्धक समन्वयाला प्रोत्साहन देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. “गोव्यात होणाऱ्या  या लघु-जागतिक संमेलनातील परस्परसंवादाच्या माध्यमातून कलेच्या जगातील सखोल आकलनाची  आणि नवीन शिकण्याची संधी मिळेल ”, असा विश्वास पंतप्रधानांनी इफ्फी हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव असल्याचे सांगत व्यक्त केला.

इफ्फी आणि भारतीय चित्रपटांनी जागतिक मंचावर स्वत:चे  एक स्थान निर्माण केले आहे. “विविध भारतीय भाषांमधील चित्रपट मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत आणि जगभरात त्यांचे कौतुक होत आहे.”, असे निरीक्षण पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नोंदवले आहे.

narendra modi

पंतप्रधानांनी सामाजिक पैलू  प्रतिबिंबित करणार्‍या आणि त्यांना आकार देणार्‍या या चित्रपटाच्या  भूमिकेवरही आपले विचार मांडले आहेत.  शतकाहून अधिक काळ ,चित्रपटाने  जगभरातील लोकांच्या कल्पना पडद्यावर उतरवल्या आहेत. सिनेमा आपल्या काळातील सामाजिक पैलू  प्रतिबिंबित करतो तसेच त्याला आकार देतो.”

सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चित्रपटांचे  कथन सामर्थ्य  आणि समृद्ध इतिहास तसेच  भारतीय भाषांमधील  कथाकथनाची कला याबद्दलही पंतप्रधानांनी विचार व्यक्त केले. “कोणतीही सरहद्द न ठेवता त्यापलीकडे जाऊन  प्रेक्षकांशी भावनिक संबंध  प्रस्थापित करण्याची अनोखी  क्षमता चित्रपटात असते. चित्रपट त्यांच्या प्रभावी  कथाकथनाद्वारे लोकांचे मनोरंजन करतात, शिक्षित करतात किंवा प्रेरणा देतात. सामाजिक परिवर्तनाचे संवाहक बनण्याची त्यांची कार्यक्षमता खरोखरच अतुलनीय आहे.भारताला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा, आधुनिकतेसोबत परंपरेच्या ऐक्याचा आशीर्वाद लाभला आहे. गद्य, कविता, संगीत, नृत्य, नाट्य, नाटकांपासून ते चित्रपटापर्यंत या विविध भारतीय भाषांमधील कथाकथनाचा इतिहास आणि कलेच्या माध्यमातून आपल्याला  आपले  सचेत  सामाजिक-सांस्कृतिक परिदृश्य मांडता येते.”

गोवा हे महोत्सवासाठी योग्य ठिकाण आहे आणि सतत वाढणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्याच्या दृष्टीने  या महोत्सवात  नवीन कल्पना घेऊन येण्यासाठी प्रतिनिधींना ते प्रेरित करेल. “सुंदर निसर्ग आणि उत्साहपूर्ण संस्कृतीमुळे,  इफ्फीचे आयोजन करण्यासाठी गोवा परिपूर्ण पार्श्वभूमी प्रदान करतो.मला खात्री आहे की, सतत वाढणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी मदत करण्याच्या अनुषंगाने गोवा, सहभागींच्या सर्जनशील कल्पनाशक्तीला चालना देईल, त्यांना नवीन कल्पनांसह पुढे येण्यासाठी  प्रेरित करेल”, असे पंतप्रधान म्हणाले.

53 वा इफ्फी मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!