google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

द इन्‍वेंटर चॅलेंज मध्ये स्‍पेशल थीम एपिसोड ‘हेल्पिंग द पीपल’

मुंबई:

कलर्स इन्फिनिटीवरील ‘द इन्‍वेंअर चॅलेंज’च्‍या आगामी एपिसोडमध्‍ये पुन्‍हा एकदा लोकांना मदत करण्‍याचा मुद्दा समोर येणार आहे. या शोमधील अद्वितीय आविष्‍कार दर आठवड्याला सर्वांना प्रभावित करत आहेत.


पॅनेलिस्‍ट्स देखील अन्‍वेषकांना त्‍यांच्‍या व्‍यवसाय संकल्‍पनांना सुधारणा करण्‍यास मदत करत आहेत. या आठवड्यातील एपिसोड प्रेक्षकांना रोमांचक आविष्‍कारांची झलक दाखवेल, जसे मॅथेबल, रंगोली डिस्‍पेन्‍सर, ३-इन-१ बेलन आणि बर्ड सेन्‍स.


गोव्‍याची निवासी ३८ वर्षीय गुंजनचा कमी खर्चिक एआर डिवाईस तयार करण्‍याचा हेतू आहे. या डिवाईसला ती मॅथेबल म्‍हणते. हे डिवाईस मुलांना भूमिती व त्रिकोणमिती सहजपणे व मजेशीर पद्धतीने शिकण्‍यास मदत करेल. सणासुदीचा काळ जवळच आला असताना २० वर्षीय श्रेया डोंगरेचा रंगोली डिस्‍पेन्‍सर वापरकर्त्‍यांना उभे राहत वर्तुळाकार रांगोळी काढण्‍यामध्‍ये मदत करतो.


आपल्‍या आईचे स्‍वयंपाकामधील कामे सुलभ करण्‍याचा प्रयत्‍न करत १६ वर्षीय रोहित परिहारने ३-इन-१ बेलन आविष्‍कार सादर केले आहे. रोहितने आपल्‍या आईला स्‍वयंपाकघरात काम करताना चिमटा, रोलिंग पिन व पळी यांच्‍यामध्‍ये दमछाक होताना पाहिले आणि त्‍यामधूनच त्‍याला हा आविष्‍कार निर्माण करण्‍याची प्रेरणा मिळाली. इन्‍वेंटर्सच्‍या यादीमध्‍ये सामील होत मुंबईतील १८ वर्षीय त्रिशित डेढियाने बर्ड सेन्‍स हा त्‍याचा आविष्‍कार दाखवला. हे डिवाईस पक्ष्‍यांना, विशेषत: कबूतरांना बाल्‍कनीमध्‍ये घरटे बनवण्‍यास प्रतिबंध करण्‍यामध्‍ये मदत करतो. खरंच, हे सर्व आविष्‍कार व इन्‍वेंटर्स निश्चितच टेलिव्हिजनवर पाहण्‍यासाठी एक पर्वणी असणार आहे!


आगामी एपिसोड पाहण्‍यासाठी सज्‍ज राहा आणि पहा ‘द इन्‍वेंटर चॅलेंज’ दर शनिवारी रात्री ८ वाजता कलर्स इन्फिनिटीवर व ‘द इन्‍वर्टर चॅलेंज’ यूट्यूब चॅनेलवर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!