
‘सिटाडेल’चा जागतिक दौरा झाला सुरू…
मुंबई:
अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी ग्लोबल स्पाय सिरीजमधील लीड जोडी प्रियंका चोप्रा जोनास आणि रिचर्ड मॅडेन हे एपिक आशिया पॅसिफिक प्रीमियरसाठी मुंबईत पोहोचले. या ग्रँड इवनिंगच्या अगोदर, सिरीजमधील मुख्य कलाकार – रिचर्ड मॅडेन आणि प्रियंका चोप्रा जोनास यांनी एका मजेदार संवादात खुलासा करत ही जबरदस्त स्पाय फ्रँचायझी तयार करण्यामागील कारण सांगितले.
अमेझॉन स्टुडिओज आणि रुसो ब्रदर्स यांच्या एजीबीओद्वारा निर्मित तसेच, शोरनर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर डेव्हिड वील यांच्या ‘सिटाडेल’चा प्रीमियर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होईल ज्यामध्ये 28 एप्रिल रोजी 2 भाग प्रदर्शित होणार असून, 26 मे पासून साप्ताहिक भाग रिलीज होतील.

*या सिरीजमध्ये नादिया सिंगची भूमिका साकारणाऱ्या प्रियंका चोप्रा जोनासने सांगितले,* “जेव्हा अमेझॉन स्टुडिओच्या हेड जेनिफर सल्के यांनी मला ‘सिटाडेल’ सादर केले तेव्हा त्यांना इंटरनॅशनल ग्लोबल फ्रेंचायझी तयार करायची होती – एक ओरिजनल आयपी जो खऱ्या अर्थाने जगाला जोडतो. अमेझॉनचा विविधतेवर ठाम विश्वास आहे आणि खरी विविधता आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शवली जाते, केवळ वेगवेगळ्या त्वचेच्या टोनद्वारेच नव्हे तर लोकांच्या बोलण्याची पद्धत ऐकून, प्रत्यक्षात संस्कृतीचा अभ्यास करून. या शोमध्ये प्रत्येक देश आणि खंडात पसरण्याची अविश्वसनीय क्षमता आहे. त्यामुळे, मला कथाही माहीत नसताना मी हे करण्यासाठी होकार दिला.”
या 6 भागांच्या सिरीजमध्ये प्रियंका चोप्रा जोनास आणि रिचर्ड मॅडेन यांच्यासह स्टॅनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल देखील मुख्य भूमिकेत आहेत. रुसो ब्रदर्स यांच्या एजीबीओ आणि शो रनर डेव्हिड वीलद्वारा एक्झिक्युटिव्ह निर्मित ‘सिटाडेल’चा प्रीमियर 28 एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार असून, 26 मे पासून साप्ताहिक भाग रिलीज होतील. अशातच, ‘सिटाडेल’ही ग्लोबल सिरीज इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये 240 देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम होईल.