google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘असा’ दिसतो ‘सालार’मधील पृथ्वीराज वर्धराज

प्रशांत नील दिग्दर्शित आगामी बहुप्रतिक्षित ‘सालार’ या चित्रपटाची दर्शक आतुरतेने वाट पाहत असतानाच, सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे नवे पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टर पाहून असे समजते की मल्याळम इंडस्ट्रीतील सुपरस्टार पृथ्वीराज वर्धराज मन्नरची भूमिका साकारताना दिसेल.

पृथ्वीराजचा हा पोस्टर पाहून दर्शकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार असून, निर्मात्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन्ही कलाकारांमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील.

पृथ्वीराजच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रशांत नील म्हणाले, “पृथ्वीराजसारखा सुपरस्टार चित्रपटात मिळणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. यापेक्षा चांगला वरदराज मन्नर आमच्याकडे असूच शकला नसता. त्याने ज्याप्रकारे चित्रपटात एवढी मोठी भूमिका साकारली आहे त्याप्रमाणे त्याने त्याच्या तारकीय व्यक्तिरेखेला न्याय दिले आहे. उत्कृष्ट अभिनयासह त्याची उपस्थिती, या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल याची खात्री आहे. मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार असल्याने, त्याचे खूप मोठे चाहते आसून, त्यांना पडद्यावर एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारताना पाहून दर्शकांना खरंच वेड लागेल. पृथ्वीराज आणि प्रभाससारख्या दोन मोठ्या कलाकारांना चित्रपटात एकत्र दिग्दर्शित करणं हा एक अद्भुत अनुभव होता.

KGF Chapter 2 या चित्रपटाला दर्शकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. तर त्याच्या अभूतपूर्व यशानंतर, प्रशांत नील आणि होमबेलचा आगामी चित्रपट ‘सलार’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे यात शंका नाही. सालारच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे, विशेषत: दोन पॉवरहाऊस अभिनेते प्रभास आणि पृथ्वीराज वर्धराज एकत्र काम करताना पाहून नेटिझन्स रोमांचित झाले आहेत. KGF फ्रँचायझीच्या यशानंतर प्रशांत निश्चितच भारतातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून उदयास आला आहे.

सालार’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असून, या चित्रपटात सुपरस्टारस प्रभास आणि पृथ्वीराज वर्धराज यांच्याशिवाय, श्रुती हसन, जगपती बापू, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी यांच्या देखील प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. प्रशांत नीलद्वारा दिग्दर्शित, विजय किरागांडूर निर्मित, होंबळे फिल्म्स बॅनरखाली हा पॅन इंडिया चित्रपट 5 भाषांमध्ये 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!